बर्ड फ्ल्यू : ‘तो’ परिसर ‘अलर्ट झोन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मीडसांगवी या गावात कोंबड्यांची मरतुक झाल्याने मिडसांगवी गावच्या परिसराचा १० किमीचा परिसर अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे.

तसेच संपूर्ण पाथर्डी तालुका नियंत्रीत क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सोमवारी (दि.११) रात्री उशिरा जारी केला आहे. राज्यात काही भागात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला आहे.

जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाची नोंद झालेली नाही.मात्र पाथर्डी तालुक्यातील मीडसांगवी गावच्या परिसरात ५० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन अलर्ट झाले आहे.

त्यानुसार प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमतील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात अलर्ट झोन आणि नियंत्रीत झोन जाहीर केले आहे.

या क्षेत्रामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना विविध उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन विभागाने पाथर्डी तालुक्यात सर्व क्कुकुटपालन फार्म, परिसरातील कोंबड्यांची तपासणी करावी व मरतुक आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.

सर्व कुक्कुट पालकांनी आजारी किंवा मृत पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी व नियंत्रण कक्षास द्यावी. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व पोल्ट्री फार्म तसेच

परसातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्­यांना भेटी देवून पक्षांची संख्या, पक्षांमधील मरतुक आदी बाबींबाबतचा सात दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखावा व ती माहिती नियंत्रण कक्षाला पाठवावी.

एखाद्या ठिकाणी कोंबड्या अथवा पक्षी मृत झाल्यास त्यांच्या संपर्कात अन्य पक्षी येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. अलर्ट झोनमधून पक्षी, अंडी, कोंबडी खत वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!