पाथर्डी तालुक्यातील ‘हा’ भाग अलर्ट झोन घोषित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशभर कोरोनाचे संकट कायम असताना यामध्ये बर्ड फ्ल्यूचे संकटाने नव्याने एंट्री केली आहे. यामुळे पुन्हा एकदा भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतेच राज्यात बर्ड फ्ल्यूची एंट्री झाली आहे.

तसेच जिल्ह्यातही काही पक्षी मरण पाऊ लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे बर्ड फ्लूसदृश रोगाने ५२ कोंबड्या मृत झाल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने मिडसांगवी व १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क भाग (अलर्ट झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी जामखेड तालुक्यातील मोहा येथे ३ कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

सोमवारी मिडसांगवी येथे बर्ड फ्लूसदृश रोगाने ५ पशुपालकांच्या ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत खबरदारीचे आदेश दिले आहेत.

मिडसांगवी व १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क घोषित केला आहे. तसेच कुक्कुटपालकांनी मृत किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना द्यावी, अधिकाऱ्यांनी विभागातील पोल्ट्री फार्मला भेटी देऊन ७ दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून नियंत्रण कक्षाला लेखी स्वरूपात कळवावे.

जिल्हाधिकारी म्हणाले…या गोष्टींची काळजी घ्या आजारी पक्ष्यांचे विलगीकरण करावे व ते पक्षी इतर प्राण्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

कुक्कुटपालकांनी आजारी पक्ष्यांची वाहतूक अथवा विक्री करू नये, सतर्क क्षेत्रामध्ये जिवंत वा मृत पक्षी तसेच अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आदींची वाहतूक करू नये, पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तत्काळ तपासणीसाठी पाठवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment