गुटखा तस्करांवर कारवाई;५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुटखा तस्करांवर पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरुच ठेवले आहे. आता नुकतेच पोलिसांनी संगमनेर तालुक्यात पोलिसांनी गुटखा तस्करांवर कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

मंगळवारी सकाळी ८ वाजता हिवरगाव पावसा टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. कारसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका कारमधून गुटख्याची तस्करी होत असल्याचे समजताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली.

हिरा पान मसाला, आरएमडी, विमल पानमसाला व रॉयल सुगंधी, तंबाखू असा ३ लाख २१ हजारांच्या मुद्देमालासह कार पोलिसांनी ताब्यात घेतली. संजय भागवत (३३), अक्षय भागवत (२६, इंदिरानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment