यंदाच्या वर्षी पतंग विक्रेत्यांवरच आली ‘संक्रांत’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-दरवर्षी संक्रांतीचा सण आला कि बाजारपेठ पतंगाने फुललेल्या असतात. मात्र यंदाच्या वर्षी वेगळे चित्र पाहायला मिळू लागले आहे. संक्रांतीनिमित्त दरवर्षी पतंगाला मोठी मागणी असते.

यंदा कोराेनामुळे ही मागणी घटली आहे. लहान मुलांचा पतंगबाजीचा उत्साह मात्र कायम आहे. कार्टूनचे चित्र व रंगीबेरंगी पतंगांची मुलांकडून खरेदी केली जात आहे. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्वच व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला.

या संकटातून पतंग निर्मितीचा व्यवसायही सुटला नाही. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे पतंगांची निर्मिती झाली नाही, तसेच शहरातील विक्रेत्यांनीही यंदा, गुजरात, मुंबई, येवला येथून जास्त माल खरेदी केला नाही.

यंदा कोरोनाच्या भीतीमुळे मैदाने व इमारतींच्या गच्चीवर पतंग उडविणारी गर्दी दिसून येत नाही, त्यामुळे विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

दरवर्षी संक्रांतीच्या आठ दिवस आधीच शहरात विविध ठिकाणी पतंग विक्रीचे स्टॉल लागतात. लहान मुलांसह तरुण मोठ्या प्रमाणात पतंग व मांजाची खरेदी करून पतंगोत्सव साजरा करतात. दरम्यान यंदाच्या वर्षी संक्रांतीच्या एक दिवस आधी व संक्रांतीच्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा विक्रेत्यांना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News