उदयनराजे भोसले हे अनाजी पंतांसारख्याच प्रवृत्तीला बळी गेले – धनंजय मुंडे

Ahmednagarlive24
Published:

मुंबई :“छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फुट पाडणारी अनाजी पंतांसारखी एक प्रवृत्ती होती. आताही तशी प्रवृत्ती या समाजात आहे. याच प्रवृत्तीला उदयनराजे भोसले बळी पडले आणि यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला,” असं मत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.

“जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असं आमिष दाखवलं गेलं किंवा त्यांच्याकडून काय असं चुकलं यामुळे त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला याची कल्पना मला नाही.

कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत याच मातीत गाढायचं असा पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निर्णय केला असल्याचे”असे या वेळी बोलताना मुंडे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment