चायना मांजाने पतंग उडविल्यास गुन्हा दाखल होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- शासनाने चायना मांजा विक्रीवर बंदी घातली आहे, धोकादायक अशा मांजाची कोणी विक्री केल्यास त्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

मात्र आता त्याचबरोबर आता पतंग उडविताना कोणाच्या हातात चायना मांजा दिसला तर त्याच्यावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

चायना मांजा विक्रीला आळा बसावा यासाठी वनविभाग, पोलीस आणि महापालिकेची पथके तैनात करण्यात आली असून त्यांची शहरात दोन दिवस गस्त राहणार आहे.

नगर शहरात मोठ्या प्रमाणावर चायना मांज्याची विक्री जोरात सुरू आहे. गेल्या आठ दिवसात तीन पक्षी मांजामुळे जखमी झाल्याचे आढळून आले आहे.

त्यामध्ये चिचुंद्री,घुबड या पक्षांचा सममावेश आहे. याशिवाय अनेक दुचाकांमध्येही मांजा अडकल्याचे प्रकार घडत आहेत. वन विभागाने मंगळवारी पाच दुकानांवर कारवाई केली. त्यामध्ये १४१ मांजा चक्री जप्त केल्याचे आढळून आले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने मांजा विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली असून महापालिका प्रशासनही कारवाई करणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe