जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे सुखद चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा प्रवास आता कोविड मुक्तीच्या दिशेने सुरू झाल्याचे एक समाधान आहे.

मंगळवारीही रुग्णसंख्येत मोठी घट होवून संगमनेर शहरातील एकासह एकूण सात जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आणखी पुढे जात 6 हजार 151 वर पोहोचली आहे.

आत्तापर्यंत कोविडने तालुक्यातील 51 जणांचे बळीही घेतले आहेत. संगमनेर तालुक्यातील एकूण कोविड बाधितांची संख्या सहा हजारांच्या पार गेली असली, तरीही आजच्या स्थितीत त्यातील केवळ 125 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

आत्तापर्यंत तालुक्यात 6 हजार 151 रुग्णसमोर आले असून त्यातील 5 हजार 976 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात अत्यंत दिलासादायक वाढ झाली असून

सद्यस्थितीत तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण आता 97.15 टक्क्यांवर पोहचले आहे. तर कोविड बाधित होवून मृत्यू होण्याचे प्रमाण 0.81 टक्के झाले आहे. येत्या 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाचा शुभारंभ होत असल्याने कोविडचा अंतही अंतिम टप्प्यात दिसू लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News