नागवडे करणार पाचपूतेंचे काम; कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात एकमकांचे परंपरागत राजकीय विरोध असलेल्या नागवडे व पाचपुते ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर श्रीगोंदाकरांना कधी नव्हे ते आता एकत्र दिसणार आहे.

खा. डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकर्ता सहविचार मेळाव्यात सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार बबनराव पाचपूते यांचे काम करण्याचे जाहीर केले.

त्यामूळे गेल्या अनेक वर्षापासून श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढणारे नागवडे व पाचपूते आता निवडणूकीच्यानिमित्ताने एकाच व्यासपिठावर श्रीगोंदाकरांना पाहण्यास मिळणार आहे.

जिल्हा व तालुकास्तरावरील राजकारणात ज्यांना तीव्र विरोध केला. त्यांच्यासोबत नागवडे आता काम कराताना दिसणार आहे. आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना सोबत घेवून नागवडे यांनी पाचपुते यांना यापूर्वीच्या विविध निवडणूकीत विरोध केला आहे. त्यामूळे नागवडे यांची ताकत तालुक्याच्या राजकारणात पाचपूते यांच्या तोडीत असल्याचे मानले जाते.

अशा परीस्थितीत नागवडे यांनी पाचपुते यांच्याबरोबर जावून यापुर्वीच्या राजकारणात साथ देणाऱ्यांच्या विरोधाताच आता काम करण्याचा निर्णय घेतल्याने श्रीगोंद्याचे राजकारण वेगळ्या वळणार गेल्यास नवल वाटायला नको.

दरम्यान नागवडेंच्या या भुमिकेमुळे पाचपूते यांची विधानसभा निवडणूकीत ताकत वाढली हे निश्चित आहे. आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार घनश्याम शेलार यांच्यासाठी आ. राहूल जगताप यांची महत्वाची भुमिका ठरणार असून याकडे जिल्ह्यासह तालुक्याचे लक्ष लागून आहे. यानिवडणूकीत नागवडे, पाचपुते अन जगताप यांच्या अस्तित्वाची खरी लढाई होणार यात तिळमात्र शंका नाही !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment