धनंजय मुंडे यांना खावी लागणार जेलची हवा; गायिका रेणु शर्माने केला आरोप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व सामाजिक न्यायमंत्री तसेच परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे हे आपल्यावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत तसेच वादात आले आहेत.

रेणू शर्मा या गायिकेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप हा ट्विट करून केला आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत सर्व आरोप फेटाळले आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणी सोबत आपण परस्पर सहमतीने संबंधात होतो तसेच दोन आपत्यांचा पिता आहे आणि त्यांचा सांभाळ करत आहे असे म्हटले आहे.

त्यांनी सादर महिलेला मुंबई मध्ये सदनिका घेण्यास व तिच्या भावाला विमा धंद्यात मदत केली आहे. या सर्व गोष्टींची माहिती माझ्या पत्नीला आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंडेंवर आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी आता एका मागोमाग एक ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना “ढोंगी” संबोधले आहे.

तसेच आपण मृत्यू पर्यंत आपण लढा देणार असल्याचे म्हटले आहे. या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत निश्चित वाढ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News