अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असणाऱ्या ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया जानेवारी २०२१ मध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश असलेला
जिल्हा निवडणूक आराखडा सहा टप्प्यात तयार करण्यात आला असून, पहिला टप्पा दिनांक १८ जानेवारी २०२१ पासून सुरू होत आहे.
ज्या टप्प्यावर सहकारी संस्थेची निवडणूक स्थगित झाली असेल, त्या टप्प्यापासून पहिल्या टप्प्यातील निवडणूकांची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या याचिका क्रमांक २६९०/२०२० मध्ये आदेशित केले आहे की, शासनाने दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या.
दिनांक २१ डिसेंबर २०२० नंतर शासनाने मुदतवाढ दिली नसल्याने, त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका दि.३१ मार्च २०२१ अखेर पूर्ण कराव्यात असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved