नवी दिल्ली : विजयादशमीच्या मुहूर्तानंतर महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात १० व हरयाणात ५ प्रचारसभा घेऊन प्रामुख्याने कलम ३७०, पारदर्शक प्रशासन, एनआरसी आदी राष्ट्रीय मुद्यांवर जोर देणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह हेसुद्धा या राज्यांत मोदींहून दुप्पट सभा घेऊन भाजपची सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्र व हरयाणात २१ तारखेला विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. सध्या भाजप केंद्र सरकारच्या निर्णयांना या दोन्ही राज्यांतून मिळणाऱ्या प्रतिसादाचा फिडबॅक घेत आहे. विशेषत: विरोधी पक्षांच्या नेत्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईिवषयी जनतेत काय वातावरण आहे? याची चाचपणी केली जात आहे. विरोधकांनी या कारवाईला ‘राजकीय सूडा’ची उपमा दिल्याने खास खबरदारी घेण्यात येत आहे.
पण, विरोधी बाकावरील अनेक नेत्यांनी ‘कलम ३७०’ सारख्या निर्णयांना पाठिंबा दिल्याने विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस ‘बचावात्मक’ भूमिकेत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह या दोघांनाही उपरोक्त दोन्ही राज्यांतील भाजपची सत्ता कायम राहील, असा ठाम विश्वास आहे. ‘हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व महाराष्ट्रातील त्यांचे समकक्ष देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आपली प्रतिमा स्वच्छ ठेवून सरकार प्रामाणिक व सक्षमपणे चालवण्यात यश आले आहे.
- कृष्णा गोदावरी खोऱ्याकरिता स्थापन करण्यात येणार निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि PPF योजनेत पैसे गुंतवा! मिळेल लाखो करोडोत परतावा
- कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा
- भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर देईल प्रचंड पैसा! मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने जारी केला रिपोर्ट
- लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत