अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-शेतीच्या वादातून आई व मुलीस खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण करून जखमी केले . तर ट्रॅक्टर चालकास देखील मारहाण करून अंगावर डिजेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील शेतकरी महिला जयश्री आदिनाथ पालवे, पुजा आदिनाथ पालवे व ट्रॅक्टर चालक सचिन रघुनाथ मुटके हे त्यांच्या शेती गट नं.१२६ मधील शेतातील ऊस भरण्यासाठी ट्रॅक्टर घेवुन जात होते.
यावेळी अक्षय पालवे व इतर ६ जणांनी रस्त्यात मातीचा ढिगारा टाकून ट्रॅक्टर अडविला. पूजा आदिनाथ पालवे हीच्या डोक्यात खाऱ्याच्या दांड्याने मारून तीचे डोके ओडले तर जयश्री आदिनाथ पालवे यांना खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण केली. यात त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला.
तर ट्रॅक्टर चालक सचिन यास देखील दांड्याने जबर मारहाण केली. यात त्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्याला डांबून ठेवत ट्रॅक्टरमधील डिजेल त्याच्या अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत जखमी जयश्री आदिनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरून अक्षय श्रीकांत पालवे,
लता श्रीकांत पालवे, भाऊसाहेब बाजीराव केदार, अमोल भाऊसाहेब केदार,महादेव कारभारी सानप, पप्पू दत्तात्रय केदार (सर्व रा.महालक्ष्मी हिवरे) यांच्याविरुद्ध सोनई पोलिसात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सपोनि ज्ञानेश्वर थोरात हे करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved