सोलापूर : आचारसंहिता कालावधीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उद्घाटनाची कोनशिला न झाकता उघडी ठेवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राचार्य विजय काकडे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिरते भरारी पथकाचे प्रमुख धनंजय पवार यांनी फिर्याद दिली आहे. शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निवडणूक आयोगाचे फिरते भरारी पथक हे जुळे सोलापूर परिसरातील टिळक विद्यापीठाच्या जवळून पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उद्घाटनाची कोनशिला झाकलेली नसल्याचे दिसून आले. . या कोनशिलेवर काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अनावरण झाल्याचा मजकूर होता.
त्यामुळे टिळक विद्यापीठाने टिळक विद्यापीठाच्या प्राचार्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.