अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार बुधवारी थांबला. जिल्ह्यातील तब्बल ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांकडे गुरुवारी रवाना झाले. एकूण ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या, तरी राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत.
शुक्रवारी ७०५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात २ हजार ५५३ मतदान केंद्र आहेत. त्यातील ५० मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी ५१९ निवडणूक निर्णय अधिकारी व ५१९ सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रांवर १२ हजार ७६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी नगर तहसील कार्यालयातून मतदानासाठी यंत्र घेऊन कर्मचारी केंद्राकडे रवाना झाले. नगर तहसील कार्यालयात तहसीलदार उमेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्राबाबत सविस्तर माहिती दिली.
राळेगण मधील गैरप्रकार उघडकीस ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अपवाद वगळता शांततेत पार पडला. प्रचार संपल्यानंतर मकरसंक्रांतीचे निमित्त साधत काही ठिकाणी साड्या व पैशांचे वाटप करण्याचे प्रकार घडल्याचे वृत्त आहे. राळेगणसिद्धीत साड्या वाटताना दोघांना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली.
१४. ६२ लाख मतदार जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. एकूण १४ लाख ६२ हजार ३६२ मतदार आहेत. त्यात ७ लाख ६५ हजार ८०१ पुरुष, तर ६ लाख ९६ हजार ५५३ महिला आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved