अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून नागरिकांनी मतदानाला जाताना तोंडावर मास्क लावून कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तिगत काळजी घेऊन
मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.
२९ ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्र स्तरावर कामकाज पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझर निवडणूक शाखेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २९ ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण मतदान केंद्र ११२ असून २७२ जागांसाठी ६११ उमेदवार रिंगणात आहेत.
६३ हजार ७८५ पुरुष मतदार, तर ३२ हजार ८९६ स्रिया मतदार आहेत. मतदान केंद्रस्तरावर प्रत्यक्ष कामकाज पाहणारे केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, पोलिस कर्मचारी यांचा अंतिम समूह गठीत करून मतदान यंत्र, नियंत्रण यंत्रासह मतदान केंद्रावर आवश्यक त्या साहित्याचे वितरण करून मतदान केंद्रावर कामकाज पाहणारे समूह रवाना करण्यात आले.
तसेच टपाल मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शुक्रवारी १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० पर्यंत मतदान असणार आहे. निवडणूक प्रकिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रनिहाय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved