डेंग्यूचे थैमान ; दवाखाने हाऊसफुल्ल!

Ahmednagarlive24
Published:

कर्जत : कर्जत शहरात डेंग्यूने थैमान घातले असताना नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील दवाखाने हाऊसफुल्ल आहेत. 

नारिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपंचायतनेे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पावसाळयात साथ रोगांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे या काळात प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

 सध्या कर्जत शहरात सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण पहावयास मिळत असून, त्यासोबत मलेरिया गोचीड ताप, पाढऱ्या पेशी कमी होणे, आदी आज़ार झालेले रुग्ण घराघरांत आढळत आहेत. हे सर्व आजार डासांमुळे होत असल्याने डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

मात्र, नगरपंचायत याकडे लक्ष द्यायला तयार नाही. नगरपंचायतचे मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांना अनेकदा फोन करूनही फॉगिंग मशीन उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे डासांची सख्या वाढली आहे. यामुळे कर्जत शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात डेंग्यूसह विविध आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. यावर प्रत्येक भागात फॉगिंग मशिनने धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे. 

नगरपंचायतीकडे अवघ्या दोनच मशीन असल्यामुळे एकाचवेळी सर्व शहरात धूरफवारणी होत नाही, त्यामुळे डासांची संख्या आटोक्यात येत नाही. प्रभातनगर परिसरात फॉगिंग मशिनने धूरफवारणी करावी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, सहा. कार्यालयीनप्रमुख समुद्र यांना फोन करूनही या भागात धूरफवारणी करण्यात आली नाही. . मुख्याधिकाऱ्यांनी आपण संबधित ठेकेदाराला सांगितले असल्याचे म्हटले आहे.

अधिकारीच अशा प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, याची चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांकडे पहायला कोणाला वेळ आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. 

कर्जत शहरातील अनेकांना ताप येणे, सांधे दुखणे, पेशी कमी होणे, घळाटा येणे, हाथ -पाय जड पडणे, अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून, डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment