अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२५ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८६७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४७ आणि अँटीजेन चाचणीत १३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नेवासा ०२, पारनेर ०५,

राहुरी ०३, संगमनेर १५, श्रीगोंदा ०५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०,

अकोले ०२, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १३, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०२, राहाता ०२, राहुरी ०५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले ०३, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०२, पारनेर ०२, पाथर्डी ०८, राहाता १०,

राहुरी ०२, संगमनेर ०५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६८९९८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ८६७
  • मृत्यू:१०७६
  • एकूण रूग्ण संख्या:७०६४१
  • अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment