रोहित पवार म्हणाले मुंडे प्रकरणात खोलात जाण्याची गरज आहे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे. पक्ष धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत ते स्वत: पहिल्या दिवसापासून उत्तरे देत आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात मुंडे यांचे नाव खराब करण्याचा किंवा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस तपास सुरू असेपर्यंत बोलणे उचित नाही. जर कोणी षड्यंत्र करत असेल तर विषयाच्या खोलात जाण्याची गरज आहे.

आमचे नेते याविषयी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली. आमदार रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातील पिंपळीत मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी वडील राजेंद्र, आई सुनंदा, पत्नी कुंती यांनी मतदान केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, जर धनंजय मुंडे यांच्यात खोट असती तर ते बोलले नसते, व्यक्त झाले नसते. त्यांच्याविरोधात बदनामीचे षड्यंत्र रचले जात असेल तर त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News