धक्कादायक ! ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ड रेल्वे मालधक्क्यात मालगाडीतून ट्रॅक्टर उतरवत असताना, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून जाऊन अल्पवयीन मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

अल्पवयीन मुलास जोखीमच्या कामावर नियुक्त केल्याने नमूद कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमोल सदाशिव घोलवड (वय १६ वर्षे, रा.अजनुज, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर) असे मृत चालकाचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी दुपारी ४:३० वाजता हा दुर्देवी प्रकार घडला.

अमोल घोलवड मालगाडीतून स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर उतरवत असतानां त्याचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटला आणि तो खाली लोहमार्गावर पडला. वरून निसटलेल्या त्या ट्रॅक्टरचे पाठीमागचे चाक अमोलच्या छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment