धनंजय मुंडेविरुद्ध हायकोर्टात याचिका !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अत्याचाराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

मंत्री मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करताना खोटी माहिती दिली. दोन मुलांची माहिती लपवली, असा आरोप करून मुंडे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत,

अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्याचे राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्तीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मंत्री मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुंडे यांनी त्या महिलेच्या बहिणीशी परस्पर संमतीने संबंध होते,

त्यातून दोन अपत्य असल्याची कबुलीच दिली आहे. धनंजय मुंडे यांनी समाजापासून आपल्याला आणखी दोन मुले असल्याची माहिती दडवून ठेवली. निवडणुकीपूर्वी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्याबाबत खोटी माहिती दिली.

असा आरोप करत धनंजय मुंडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या. अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी जनशक्ति संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment