नगर – आमदारकीची माझी 5 वर्षाची कारकिर्द जनते समोर आहे. त्यापूर्वीच्या 25 वर्षाच्या काळात नगरचा विकास ठप्प झाला होता. त्याला चालना देण्याचे काम मी गत 5 वर्षात केले. रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी आय.टी.पार्क सुरु केले. बालिकाश्रम रोड, केडगाव देवी रोड व कोठी ते सक्कर चौक या प्रशस्त रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले.
शहराच्या प्रत्येक प्रभागात सरासरी 20-25 विकास काम केली आहेत. विकासाचा वेग आता गतीने पुढे नेऊ. मात्र, त्यासाठी गतवेळे प्रमाणे यंदाही बहुमताने मला विजयी करावे, असे अवाहन काँग्रेस-राष्ट्रवादी, समाजवादी, रिपाई (कवाडे गट), स्वाभीमानी संघटना आघाडीचे उमदेवार आ.संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर शहर काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी आ.जगताप बोलत होते. यावेळी आघाडीच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले.
पुढे बोलतांना आ.जगताप म्हणाले , जे 25 वर्ष आमदार आणि काहीकाळ मंत्री होते त्यांनी या मोठ्या काळात विकासाकडे दुर्लक्ष करुन केवळ भावनेचे राजकारण केले. या काळात एक पिढी बरबाद झाली.
रोजगार नाही, विकास ठप्प ही बाब विचारत घेऊनच मी गत 5 वर्षात काम सुरु केले. आय टी पार्क ही त्यांची सुरुवात आहे. भिंगारचा मुख्य रस्त्याचा मोठा प्रश्न सोडविला तसेच नगर, भिंगार, परिसरातील ग्रामीण मनपा हद्दीतील भाग, बुरुडगाव ग्रा.पं. अशा प्रत्येक ठिकाणी आपण कामे केली आहे.
वारुळाचा मारुती ते निंबळक रस्त्याचे काम सुरु आहे. महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. विडी उद्योगावर संक्रांत आहे. त्याआणि अन्य महिलांना घरबसल्या काम देण्याची योजना हाती घेतली आहे, असे ही आ.जगताप म्हणाले.
प्रारंभी शहराध्यक्ष भुजबळ यांनी प्रास्ताविकात ‘शहरात’ पक्षाचे 25 ते 30 हजाराचे हक्काचे मतदान आहे ते आ.जगताप यांनाच मिळवुन देण्यासाठी त्यामतदारांपर्यत पोहचण्याचे काम आम्ही करणार आहे. पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात, युवानेते सत्यजीत तांबे पा. यांच्या आदेशानुसार शहर काँग्रेस आघाडी धर्म पाळणार आहोत.
यावेळी प्रदेशसदस्य शामराव वाघस्कार, सोपानकाका साळुंके, इंटकचे हनीफ शेख, भिंगार महिला अध्यक्ष मार्गागेट जाधव, प्रदेश महिला सदस्य शिल्पा दुसुंगे, जरीणा पठाणे आदीची समचोचित भाषणे झाली.
पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष फिरोज खान, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष दिलीप सकट, अभिजित कांबळे, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, रवी सुर्यवंशी, मुकुंद लखापती, शारदा वाघमारे, मिना घाडगे, सुमन काळापहाड,
उपाध्यक्ष एम.आय.शेख, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, डॉ.जाहिदा शेख, डॉ.साहिद शेख, यु.कॉ.चे अजहर शेख, समीर पठाण, अॅड.नरेंद्र भिंगारदिवे, रजनी ताठे, हेमलता घाटगे, अशोक दुसुंग पा. अनिल परदेशी, शरद शिंदे, सुशिल कदम, देवराम गोरे, आनंद दारोळे, एन.एस.यु.आय.चे दानिश शेख, मनोज सत्रे, विवेक येवलो,
असलम शेख, राम खुडे, संजय झोडगे, राजेश बाठिया, अजय औसरकर, कदिर शेख, नदीम शेख, राजू पडोळे, भिंगार अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले, सुनिल उल्हारे, रिजवान शेख, संतोष धीवर, महिला अध्यक्षा सविता मोरे, मनोज रणदिवे, राष्ट्रवादी काँ.चे.मुन्नाशेठ आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले तर आभार श्री.भुजबळ यांनी मानले.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..