जिल्ह्यातील मतदान मोजणी प्रक्रिया ‘या’ ठिकाणी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सोमवार (दि.18) रोजी मतमोजणी होणार आहे.

इच्छुक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे, आता सोमवार रोजी मतपेट्या खुलणार व यातूनच काही जणांचा विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. दरम्यान या मतमोजणीच्या ठिकाणे संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी निश्चित केली असून त्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे.

त्यानुसार अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 8 वाजता तहसील कार्यालय याठिकाणी होईल. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 10 वाजता मातोश्री मालपाणी विद्यालय याठिकाणी, कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 9 वाजता,

राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी राहुरी कॉलेज येथे सकाळी 9 वाजता, श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे सकाळी 9 वाजता, नेवासा तालुक्यातील मतमोजणी शासकीय गोडावून मुकिंदपूर या ठिकाणी सकाळी 10 वाजता,

नगर तालुक्यातील मतमोजणी पाऊलबुधे विद्यालय सावेडी येथे सकाळी 9 वाजता, पारनेर तालुक्यातील मतमोजणी तहसील कार्यालय येथे सकाळी 10, पाथर्डी तालुक्यातील मतमोजणी तहसील कार्यालयात सकाळी 9 वाजता, शेवगाव तालुक्यातील मतमोजणी तहसील कार्यालयात सकाळी 9 वाजता,

कर्जत तालुक्यातील मतमोजणी नवीन तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता, जामखेड तालुक्यातील तहसील कार्यालय येथे सकाळी 8 वाजता, श्रीगोंदा तालुक्यातील मतमोजणी शिवाजी महाविद्यालय दौंड रोड या ठिकाणी सकाळी 9 वाजता होणार आहे.