कर्जत :- राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या बारामतीच्या पवार कुटूंबातील रोहित पवार हे नगरच्या कर्जत – जामखेड मतदार संघातून पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
मात्र, काल – परवाच नगरमध्ये आलेल्या बारामतीच्या पाहुण्यांना नगकरकर स्वीकारणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत स्थानिक विरोधकांनी बारामतीचे पार्सल परत पाठवा, असा नारा दिला आहे. त्यामुळे पवार हे पराभूत झाल्यास लोकसभेनंतरचा हा पवार कुटुंबाला मोठा धक्का असणार आहे.

कर्जत – जामखेड मतदार संघातून भाजपाचे नेते ना. राम शिंदे हे निवडणूक लढवत आहे. त्यांनी पाच वर्षात काही कामे केली मात्र अनेक कामे प्रलंबित आहेत. फक्त उद्घाटने करून ती कामे पूर्ण केलेली नसल्याच्याही तक्रारी आहेत.
येथील रस्ते, पाणी, आरोग्य या मुलभूत समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आलेले आहे. त्यामुळे येथे बदल होण्याचे संकेत मिळत होते. मात्र, राष्ट्रवादीने येथे स्थानिक इच्छुकांची त्यात मंजूषा गुंड या प्रबळ दावेदार असतानाही येथे बारामतीचा उमेदवार आणून रोहित पवारांना संधी देण्यात आली आहे.
अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क असला तरी काही दिवसांपुर्वीच मतदार संघ पिंजून काढणाऱ्या पवारांना जनता अजुनही अपेक्षित साथ देताना दिसत नाही. पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर रस्ते, पाण्याचे टँकर देवून शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखविले आहे.
परंतु, जनतेला हा स्वार्थ न कळण्याइतपत कुणीही दूधखुळे नाही. त्याच गोष्टीचा आधार घेवून बारामतीचे पार्सल पुन्हा पाठवा, असे आवाहन विरोधी गट करत आहेत. तसेच, लोणीची यंत्रणाही येथे कार्यरत असल्याने या निवडणुकीचा काय निकाल लागेल? याबाबत राज्याला उत्कंठा लागली आहे.
- एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! Nashik ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट, नाशिकवरून महाराष्ट्रातील ‘या’ शहरांसाठी दर 15 मिनिटांनी धावणार बस
- सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल, 28 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा राहिला ? महाराष्ट्रात काय आहे स्थिती ? वाचा….
- 38 वर्षांपूर्वी Royal Enfield Bullet 350 ची किंमत किती होती ? 1986 मधील बुलेटचे बिल पाहून तुम्हीही चकित व्हाल, पहा….
- वाईट काळ आता संपणार ! 28 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार, प्रत्येकच कामात मिळणार जबरदस्त यश
- Ahilyanagar Gold Price : अक्षय्यतृतीयेला सोने खरेदी करा, सोन्याचे भाव वाढणार! गुंतवणुकीसाठी हीच सुवर्णसंधी….