तीन महिन्यात सात बारा कोरा करू

Ahmednagarlive24
Published:

सोलापूर : विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीने भाजपातून आलेले उत्तम जानकर यांना माळशिरस (राखीव) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज माळशिरस येथील वेळापूरमधून प्रचाराला सुरुवात केली. वेळापूर हे उत्तम जानकर यांचे गाव असल्याने पहिल्याच सभेला मोठी गर्दी जमवत जानकर यांनी ही निवडणूक रंगतदार होणार याची चुणूक दाखवून दिली.

अजित पवार यांनी या मतदारसंघाचे महत्त्व ओळखत तब्बल सव्वा तास तुफान टोलेबाजी करीत फडणवीस सरकारला धारेवर धरले. तसेच आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे आश्वासनही दिले.

यावेळी पवार यांनी फडणवीस सरकारच्या कर्जमाफीबाबत अतिशय तिरकस शब्दात टीका केली. या सरकारला शेतीचे काही कळत नसल्याचे सांगताना यांना तेल्याही कळत नाही आणि लाल्याही कळत नाही, असा टोला लगावला.

यावेळी अजित पवार यांनी कडकनाथ प्रकरणावर बोलताना सदाभाऊ खोत यांच्यावरही शेरेबाजी केली. ज्यांनी बँका बुडवल्या त्यांच्यावर हे पांघरून घालत आहेत, असे सांगत मोहिते पाटलांना टोला लगावला. अजित पवार म्हणाले की, भाजपला आलेला सत्तेचा माज उतरवण्यासाठी आघाडीच्या हातात सत्ता द्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment