धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, या षड्यंत्राविरोधात त्यांचे सर्व समर्थक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगत

मंत्री मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कदापिही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात असून, २००६ पासून संबंधित महिला व मुंडे यांची जवळीक असून, त्यांना दोन मुले आहेत. त्यानंतर आता २०२१ ला तीच महिला मुंडे यांनी माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत करून मुंडे यांना बदनाम करत आहे.

ही जनतेला न पटणारी गोष्ट असून, मुंडे यांना ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न आहे. सन २००६ पासून या महिलेची मुंडे यांच्याशी ओळख आहे, तेव्हा मंत्री मुंडे आमदार नव्हते, कोणत्याच पदावर नव्हते, त्यावेळेसच त्यांच्यावर या महिलेने गुन्हा का नोंदला नाही ? आता मुंडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाले.

आता १४ वर्षानंतर या महिलेला माझ्यावर अत्याचार झाल्याची उपरती कशी झाली. एखाद्यावर आरोप करणं खूप सोप असतं; परंतू जाणीवपूर्वक आरोप करून एखाद्याला बदनाम करणे योग्य ठरणार नाही. मंत्री मुंडे यांना कोणीही कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे हितचिंतक, कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असे माजी सभापती पालवे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment