अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-खेळण्या बागडण्याच्या वयात हाती आलेलं कामामुळे चिमुरडी फुल कोमेजून जातात. यातच व्यवसायिंकांकडून या अल्पवयीन मुलांचा छळ केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
यातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुरी खुर्द येथील पवन यादव (मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी) हा बेकरी चालक १४ ते १६ वयोगटातील बाल कामगारांना वेठबिगारी तसेच
अंगाला चटके देऊन छळ करत असल्याचे उघड झाले असून राहुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राहुरी खुर्द येथील बेकरी चालकाकडे उत्तरप्रदेश,
बिहार येथील रहिवासी असलेले तीन बालकामगार कामासाठी आणण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून उपाशी पोटी काम करून घेणे, काम न केल्यास अंगास चटके देणे मारहाण करणे, अघोरी कृत्य प्रकार या पावन यादव नाराधमाकडून सुरु होता.
या मुलांच्या छळाची माहिती मिळाल्याने राहुरी पोलिसांनी राहुरी खुर्द येथे जाऊन बेकरी चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved