जामखेड – भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचाराचा संपूर्ण भर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर ठेवला आहे. प्रचार रॅलीतून फिरतानाही समस्या, सूचना आणि अडचणींचा थेट मागोवा घेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. पहाटे पाच वाजल्यापासून शिंदे यांचा दिनक्रम सुरू होत असला, तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची कामे चालूच असतात.
रॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांशी भेटी, बैठका, अशा सगळ्याच माध्यमांद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याला प्राधान्य देणे आणि त्यांच्याकडून सूचना घेऊन त्यानुसार रणनीती ठरवणे, हे त्यांच्या प्रचाराचे तंत्र दिसून येते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून, आपली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी गावोगावी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे.
केवळ ना. शिंदेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण आपल्या परीने वेगवेगळ्या भागांमधील प्रचारांमध्ये गुंतलेला दिसतो. त्यांचे सासरे आणि पत्नीही प्रचारात सक्रिय असल्याचे दिसते. सकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना सुरुवात होते.
शिवसेना, भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला जातो. त्यानंतर नऊ वाजल्यापासून प्रत्येक ठिकाणच्या प्रचार रॅलीला सुरुवात होते. मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील सर्वात लहान मतदारसंघ ठरतो. अगदी कर्जत-जामखेड या मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा शिंदे यांचा प्रयत्न दिसून येतो.
तालुक्यातील गावासाठी केलेल्या विकासकामांची माहिती आपल्या प्रचार दौऱ्यात मतदारांना सांगण्यावर त्यांचा भर आहे. दररोज किमान सात ते आठ गावांत जाऊन ना. शिंदे यांचा संपर्क सुरू असतो. शिंदे यांनी निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच एक फेरी मतदारसंघात पूर्ण केली आहे. प्रचारफेरी पूर्ण केल्यानंतर ते गावोगावांत भेट देऊन छोटेखानी कॉर्नर मिटिंग घेताहेत.
- Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले
- Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सची धमाल ! Tata Sierra EV सादर, किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट जाणून घ्या
- लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?
- Tata Power Share : टाटा पॉवर शेअरची झेप; ब्रोकिंग फर्मने दिली चकित करणारी टार्गेट प्राईस
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रोच्या वेळेत झाला मोठा बदल