निवडणूक रणांगण ! गिते यांच्या गटाने सत्ता कायम राखली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होता आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहे.

नुकतेच पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे.

9 पैकी पाच जागांवर गिते यांच्या गटाने विजय मिळवला आहे. लोहसर ग्रामपंचायतीत अनिल गिते यांना सुखदेव गिते यांच्या पॅनलने आव्हान दिले होते. यावेळी मोठी चुरशीची निवडणूक झाली.

अनिल गिते व त्यांच्या पत्नी हिराबाई गिते हे दोघेही विजयी झालेे आहेत. अनिल गिते यांच्या घरात गेल्या वषार्पासूनची सत्ता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment