अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला.
खारेकर्जूने येथे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या गटाची गेल्या ६५ वषार्पासून अबाधित सत्ता होती. परंतु मागील वेळी येथे शेळके यांच्या गटाचा पराभव झाला होता.

यावेळी स्व. दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांच्या गटाने विरोधी गटाचा ११ पैकी ११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved