अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-नगर शहरात वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, व्यापाऱ्यांकडील रोख रक्कम चोरी आदींचे प्रमाण वाढले आहे.
विशेषत: मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांवर पाळत ठेवुन त्यांच्याकडील रोख रक्कम चोरण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत प्रभावी उपाययोजना करुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आ. संग्राम जगताप व व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चोरीच्या घटनांबाबत सविस्तर कैफीयत मांडली.
कोठी रोड परिसरात व्यापारी राहुल भंडारी यांच्याकडील साडेसात लाखांची रोकड दोन अज्ञात इसमांनी पळवली. तर महात्मा फुले चौकात रितेश पारख युवकाच्या हातातील मोबाईल दोन युवकांनी हिसकावून पोबारा केला.
अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांना आळा बसण्यासाठी व चोरट्यांना जरब बसण्यासाठी बीट मार्शलची गस्त वाढवावी. अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved