अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेची भव्य इमारत लवकरच उभारणार आहोत असे प्रतिपादन शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी केले .
नवीन इमारत बांधकामासंबंधी संस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली .
यावेळी पुणे रोटरी क्लबकडून गरजू विद्यार्थीनींना मोबाईल भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते . शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे नुतन अध्यक्ष अनिल बोरा , सचिव नंदकुमार निकम , देवदैठण शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा , लोणीकंद शाळा समिती अध्यक्ष धरमचंद फुलफगर,
शिक्रापुर शाळा समिती अध्यक्ष प्रकाश बोरा , संचालक शिरीष गादीया आदी पदाधिकाऱ्यांनी प्रशालेला भेट देत धोकादायक इमारतीची पहाणी केली .
यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सन्मान प्रशाला व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला . मुख्याध्यापक आर .टी . शिंदे यांनी प्रास्ताविकात शाळेबद्दलचा इतिहास सांगताना इमारतीची समस्या असल्याचे सांगितले .नवीन इमारत व्हावी अशी मागणी ग्रामस्थांची खुप दिवसांपासूनची आहे .
लवकरच अत्याधुनिक भव्य इमारतीचे बांधकाम संस्था , ग्रामस्थ व शिक्षकांच्या सहकार्यातून पूर्णत्वास नेण्याचा संकल्प अध्यक्ष अनिल बोरा , सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केला . तसेच संस्था , शाळा व गाव यांच्यात सांघिक भावना वृद्धींगत व्हावी असे अध्यक्ष अनिल बोरा यांनी सांगितले.
पुणे येथील रोटरी क्लबचे अजय दुबे यांच्यावतीने व अध्यक्ष अनिल बोरा यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन शिक्षणासाठी प्रशालेतील दहा गरजू विद्यार्थीनींना चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्यात आले .
यावेळी मुख्याध्यापक आर .टी . शिंदे ,संत निंबराज देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दंडवते , माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ , उद्योजक वसंत बनकर,उद्योजक सर्जेराव कौठाळे , पर्यवेक्षक संपतराव गाडेकर व शिक्षकवृंद उपस्थित होते . सुत्रसंचालन संपतराव गाडेकर यांनी केले तर संदीप घावटे यांनी उपस्थितांचे आभार मानले .
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved