अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-सरकारी नौकरी म्हंटली कि अनेक सरकारी बाबू आपल्या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरु करतात. कार्यालयाचे हुकूमशाह बनत कर्मचाऱ्यांना तुच्छ वागणूक देणे, चुकी नसताना त्यांच्यावर करवाई करणे अशा अनेक घटना सरकारी कार्यालयात घडत असतात.
अशाच काही तक्रारींचा पाढा जामखेड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी वाचला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार देखील काही महिन्यांपासून थकीत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान जामखेड नगर परिषद कर्मचाऱ्यांचे २ महिन्यांचे थकीत वेतन देण्यात यावे.
या मागणीसाठी जामखेड नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. २० जानेवारी रोजी १ दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जामखेडचे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना सादर केले.
जामखेड नगरपरिषद मुख्यधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारास कर्मचारी वैतागले असून आपल्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्य पद्धतीत बदल न झाल्यास ‘सीईओ हटाव जामखेड बचाव’ असे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे.
जामखेड नगर परिषदेचे सीईओ कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा पुस्तकावर गैरवर्तणुकीच्या नोंदी केल्या जातील, दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल अशा धमक्या देखील दिल्या जात असल्याचे कर्मचारी प्रतिनिधीने सांगितले. मुजोर सीईओ आकस बुद्धीने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारतो आहे.
सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचे सहाय्यक अनुदान वेळच्या वेळी कार्यालयीन खात्यावर जमा होत असूनही संवर्ग व कायम कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात येत आहे. दरम्यान अशा सीईओ विरोधात कर्मचारी एकटवले आहे व असा अधिकारी नको अशी मागणी करू लागले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved