थकीत वेतनाअभावी नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- सध्या जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, नगरपरिषद येथील कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा महत्वाची समस्या समोर येत आहे. जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेची कर्मचार्यानाचे देखील गेल्या दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे.

तसेच शेवगाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे पगार देखील अडवून ठेण्यात आले आहे. आता नेवासा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे देखील पगार रखडले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान नेवासा नगरपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांचे चार महिन्यांचे थकीत वेतन मिळावे

या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून 24 जानेवारी पर्यंत न दिल्यास 25 जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून किराणा, दूध तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू कर्मचारी उधार घेत आहेत .वेतन न झाल्याने आता दुकानदारांनी कर्मचार्‍यांना उधार देणे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी प्रशासनाने कर्मचार्‍यांचे वेतन अदा करावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News