अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार,नराधमास अटक !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ ‘भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील एक 14 वर्षं वयाची अल्पवयीन मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता

त्या ठिकाणी जावून आरोपी हिरामण संभा तिखोळे, रा. वडगाव सावताळ, ता, पारनेर याने सादर अल्पवयीन तरुणीला धरून तिला धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला.

जर कोणाला काही सांगितले तर तुला संपवुन टाकील, अशी धमकी दिली. हा आरोपी पिडीत तरूणीवर अत्याचार करायचा त्यातुन तिचे पोट दुखू लागल्याने तिच्या आईने विश्वासात घेवून विचारले असता

तिने हिगमण संभा तिखोळे याने अत्याचार केल्याचे सांगितले. काल याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पारनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी हिगमण संभा तिखोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस पथकाने भेट दिली असून याप्रकरणाचा अधिक तपास सपोनि वाघ हे करीत आहेत. दरम्यान आरोपी हिरामण संभा तिखोळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News