पुन्हा वाढले सोने आणि चांदीचे दर वाचा सविस्तर..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरांत मोठी चढ-उतार होतोना दिसत आहे. मात्र आता सोने, चांदीच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. त्यामुळे ग्रहाकांमध्ये सोने खरदी करायला हवी की नको असा प्रश्न निर्माण होत आहे.

दिल्ली बुधवारी सोन्याच्या दरांत 347 रुपयांची वाढ नोंदली गेली. त्यामुळे आता 10 ग्राम सोने खरेदी करण्यासाठी 48 हजार 758 रूपये मोजावे लागणार आहेत. देशांतर्गत बाजारात चांदीच्या भावातही बुधवारी वाढ नोंदली गेली.

चांदीचे दर 606 रूपायांनी वाढले आहेत. बुधवारी झालेली वाढ लक्षात घेता आता चांदी खरेदी करण्यासाठी 65 हजार 814 रूपये मोजावे लागणार आहेत. मागील सत्रात चांदीचे दर 65 हजार 208 रूपयांवर पोहोचले होते.

जागतिक स्तरावर किंमतींच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमतीतही वाढ दिसून आली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील सत्रात सोन्याचे दर 48 हजार 411 रूपयांवर पोहोचले होते. त्यामुळे सोन्याची मागणी काही प्रमाणात घटली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment