पुजारी महिलेच्या दागिन्यांवर चोरटयांनी डल्ला मारला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच महिलांना फसवून त्यांचे दागिने लुटणाऱ्या टोळीच जणू सक्रिय झाल्या आहेत.

जिल्ह्यात अशा वाढत्या घटनांमुळे महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नुकतेच राहुरी शहरातील शुक्लेश्वर मंदिरातील पुजारी महिलेला दोघा भामट्यांनी गंडा घालत दीड तोळ्याची सोन्याची पोत हालचलाखीने लांबविल्याची घटना बुधवारी (ता.20) घडली आहे.

यामुळे शहरवासियांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी शहरातील मध्यवस्तीत असणार्‍या शुक्लेश्वर मंदिरात पुरोहित कुटुंबीय पौराहित्य करतात.

बुधवारी दोघे अज्ञात इसम मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने आले. त्यांनी धनश्री पुरोहित यांना पूजा करायची असे सांगितले. याचवेळी संधीचा फायदा उचलत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत हातचलाखीने लांबवली.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. दरम्यान, या घटनेने शहरात पुन्हा चोर्‍यांचे सत्र चालू झाल्याचे अधोरेखित होऊन पोलिसांसमोर नवे आव्हान ठाकले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News