अहमदनगर: आमदारकीसाठी इच्छुक असणा-या सगळ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करत भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्यच बुधवारी नगर येथे उलगडले. विखे यांच्या या विधानाने व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. नगर मतदारसंघातून शिवसेनेकडून यावेळी अनेकजण इच्छुक होते. मात्र अनिल राठोड यांना उमेदवारी मिळाली. तो धागा पकडत विखे राठोड यांना उद्देशून म्हणाले, ‘तुमचे आता वय झाले आहे. पण एवढी घ्या मारुन अन् रिटायर व्हा. म्हणजे बाकी लोकांचे नंबर लागतील. आमदार व्हायचे असेल तर जे इच्छुक आहेत.

त्या प्रत्येकाला पुढच्या आमदारकीचा शब्द द्या. फक्त कुणाला शब्द दिला हे इतरांना कळू देऊ नका. पन्नास वर्षे आम्ही हेच राजकारण करत आलो आहोत. तुम्ही आमच्या सानिध्यात या’ असे ते म्हणाले.
- CISF Sports Quota Jobs 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंना नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 403 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
- 18 मे – 10 जून 2025 दरम्यान बँकांना ‘इतके’ दिवस सुट्टी राहणार ! वाचा सविस्तर
- भारतात आढळतो किंग कोब्रापेक्षाही विषारी साप ! ‘या’ सापाच्या दंशाने व्यक्ती वाचली तरी पॅरालिसीस होऊ शकतो
- पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर