धक्कादायक : सीरमच्या आगीत 5 जणांचा मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-कोरोना लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

मांजरी एसईझेड प्लँटमध्ये आग लागली. लोटा वायरस प्लँटमध्ये ही आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमनदलाने ही आग विझवली. संपूर्ण आग विझल्यानंतर, आत जाऊन पाहिल्यानंतर 5 मृतदेह सापडले आहेत.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला निघाले आहेत. आगीच्या पार्श्वभुमीवर अजित पवार देणार सीरमला भेट देणार आहेत.

तसेच “सीरममधील आग नियंत्रणात आली आहे. बीसीजी प्लांटमध्ये आगीचा प्रकार घडला आहे. सुदैवाने कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे.

विद्युत बिघाडामुळे आग लागली होती. पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील भाष्य करणे योग्य ठरेल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News