महाआघाडी सरकारने शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय जनतेला भावले म्हणून महाआघाडीला कौल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असून, ३६ गावांत महाआघाडीला यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी केला आहे.

बिनविरोध पार पडलेल्या खेर्डे व सोमठाणे खुर्द ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचे पत्रक ढाकणे यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे.

पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. आडगाव, माळीबाबुळगाव, भिलवडे, भोसे, चितळवाडी, चिंचपूर इजदे, ढाकणवाडी,

घाटशिरस, घुमटवाडी, जाटदेवळे, मुंगुसवाडे, मोहोज बु. मोहोज खुर्द, मोहटे, मालेवाडी, नांदूर निंबादैत्य, निपाणी जळगाव, पारेवाडी, पिंपळगवाटप्पा, पिरेवाडी, राघोहिवरे, रांजणी,

शिराळ, शेकटे, तोंडोळी व वाळुंज ग्रामपंचायीसह अन्य पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश मिळविले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी पक्षाला चांगले यश मिळाले असून,

महाआघाडी सरकारने शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय जनतेला भावले आहेत. त्यांनी महाआघाडीला कौल दिला आहे. ढाकणे यांच्या पाथर्डी कार्यालयातून याबाबत पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News