मुंबई : क्षयरोगाने ग्रासलेल्या पित्याला आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. आपल्याशिवाय मुलांच्या भवितव्याचे काय होणार? ही विवंचना त्याला सतावू लागली. परिणामी नैराश्यातून त्याने दोन्ही मुलांची हत्या करत स्वत:चेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला वेळीच रोखत अटक केली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे.
घाटकोपरमधील इंदिरानगर विभागात वाहनचालक असलेला चंद्रकांत मोहिते हा भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होता. चंद्रकांतला काही दिवसांपासून क्षयरोगाने ग्रासले होते. आजार बळावत असल्याने गेले काही दिवस तो नैराश्येत होता.
आपल्या पश्चात मुलांचा पत्नी नीट सांभाळ करणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे त्याने मंगळवारी रात्री गौरवी (११) आणि प्रतीक (७) या आपल्या दोन मुलांना घेऊन स्विफ्ट कारमधून साताऱ्यातील आपल्या मूळगावी देवदर्शनाला जातो, असे सांगून बाहेर पडला. यानंतर रात्री साताऱ्याकडे येत असताना त्याने आपल्या भावाला फोनवरून आपण दोन्ही मुलांना मारणार असल्याचे सांगितले आणि स्वताच्या दोन मुलांची हत्या केली.
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ
- Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांसाठी भरती सुरू; करा
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘