अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला ४ वर्षात ४ पोलीस निरीक्षक बदलून गेले. श्रीरामपुरात आता नव्याने एसपी मनोज पाटील यांच्या आदेशाने शहर पोलीस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणुन संजय दत्तात्रय सानप यांची नेमणुक करण्यात आली आहे.
रात्रीच तसा आदेश एसपी कार्यालयातून जारी करण्यात आला असून पोनि संजय सानप यांनी रात्रीच शहर पोलीस स्टेशनची सुत्रे पोनी खान यांच्याकडून स्वीकारले व कामकाज सुरू केले.
पोनि संजय सानप हे नाशिक क्राईम ब्रान्चला ६ वर्षं होते. आडगाव पोलीस स्टेशन, शिरपूर पोलीस स्टेशन, देवपूर पोलीस स्टेशन या धुळे जिल्ह्यातील कार्यक्षेत्राहही त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.
त्यानंतर त्यांची बदली नगर येथे झाली. नगरला पोनि संजय सानप हे एसपी पाटील यांच्या टूप्लस पथकात कार्यरत होते. श्रीरामपुरला चांगला अधिकारी द्यावा,
अशी मागणी जनतेतुन झाल्यानंतर एसपी मनोज पाटील यांनी पोनि सानप यांना श्रीरामपूर येथे नेमणुक दिली. श्रीरापपूर शहरात वाळू तस्करी. गंठण चोरी, इराणी गुन्हेगार, राजकीय गुन्हेगारी,
वाहतुकीच्या समस्या, राजकीय आशीर्वादाने चालणाऱ्या टोळ्या या सर्वांवर वाचक निर्माण करत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved