अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-नेवासा नगरपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांचे चार महिन्याचे वेतन थकीत असून ते मिळावे या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
वेतन दि. २४ जानेवारी पर्यंत न दिल्यास दि. २५ जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर बहिरु चव्हाण, अरुण चित्ते, सुधाकर चांदण सहादु पवार, वहाब बागवान, इसाक इनामदार, राजेंद्र चौरे, अशोक अल्हाट, श्रीमती सिंधु बागवान,अजय चक्रनारायण, सुधीर चित्ते, अशोक सोनवणे,अनिता सोनवणे,
अस्लम पठाण, दानील चक्रनारायण, यशोदास साळवे, राजु सरोदे, संजीवनी चक्रनारायण, कल्पना चक्रनारायण, मीना चक्रनारायण ,कल्पना चक्रनाराय, शांता चक्रनारायण, उलसा चक्रनारायण, साखरबाई चक्रनारायण, प्रयागा बोर्ड ,बाळु भोसले, इंदुबाई चव्हाण ,मंदा वडागळे आदींच्या सह्या आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved