रेल्वे लाईनच्या बाजूला युवकाचा मृतदेह आढळला,परीसरात उडाली खळबळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- राहुरी खुर्द येथील तरुण रविंद्र भाऊसाहेब चव्हाण याचा मृतदेह निंबळक येथे रेल्वे लाईनच्या बाजूला पूर्णपणे जायबंदी झालेल्या अवस्थेत आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे .

चव्हाण हा एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने नेहमीप्रमाणे गुरूवारी दहाच्या सुमारास घरातून दुपारी लवकर येतो,असे सांगून बाहेर पडला. घरच्यांची दुपारी नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्यामूळे कार्यक्रमास येण्यासाठी रवींद्रला फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे घरच्यांना चिंता वाटायला लागली.

घरच्यांनी मित्रांकडे चौकशी केली मात्र काहीही माहिती न मिळाल्याने आजूबाजूचा परीसर पिंजून काढला.सोशल मिडीयावर त्याचा फोटो टाकून कुणाला माहीती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. परंतू काहीही माहिती मिळू शकली नाही.

त्यांचे जवळचे नातेवाईक सचिन मगर हे बुऱ्हानगर येथून येत असताना त्यांना रवींद्र याची टीव्हीयस कंपनीची मोटारसायकल बँग,मोबाईल, लॅपटपसह कंपनीची वसूल केलेली रक्कम दुपारी ३ वाजता वांबोरी फाटा येथे आढळली.

मात्र रवींद्र मिळून आला नाही. शेवटी नातलगांनी राहुरी पोलिस स्टेशनला मिसिंगचा गुन्हा दाखल केला.रात्री आठच्या सुमारास निंबळक येथे एका युवकाचा मृतदेह सापडल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.

सापडलेला मृतदेह सिव्हील रुग्णालयात ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक व मित्र मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नगर येथे गेले.तेव्हा तो मृतदेह रविंद्र याचाच असल्याची खात्री झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला.

रविंद्र याच्या अंगावर अनेक जखमा तसेच छातीवर मोठया प्रमाणात मारहाण झाल्याच्या खूना होत्या.तसेच हात-पाय पूर्णपणे जायबंदी झाले होते.त्यामुळे त्याचा अपघात झाला की घातपात हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment