अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप काळे यांनी निवडणुकीत यशस्वीरीत्या बाजी मारली आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या आदेशानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होऊन योग्य आणि होतकरू उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.
त्यात नगर तालुक्यात एकमेव उमेदवार निवडून आला. मात्र सर्वसामान्य तरूणांना देखील राजकारणात जागा आहे, हे या निवडणुकीत पहायला मिळाले.
संदीप काळे हा अतिशय सर्वसामान्यांमधील व्यक्तीमत्व म्हणून आज गावपातळीवर लोकांनी निवडून दिले. राज ठाकरे यांना अभिप्रेत विकासकामे करून
मतरूपी मिळालेला आशिर्वाद खरा करून दाखवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संदीप काळे यांच्या सत्कारावेळी केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved