सीरम इ्स्टिटट्यूटच्या आगीबद्दल शरद पवार म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-सीरम इ्स्टिटट्यूटमधील आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना असून कोविशिल्ड लस सुरक्षित आहे, असे शरद पवार यांनी सीरम इ्स्टिटट्यूट आगीची पाहणी दौऱ्यात व्यक्त केले.

कोविडमुळे जगाच्या नकाशावर असलेल्या कोविड लस संशोधन करणारी, लस तयार केलेली भारतातील एकमेव कंपनी ही पुणे हडपसरमध्ये असून सीरम इ्स्टिटट्यूटला आग लागली.

आगीत कंपनीचे एक हजार कोटीचे मोठे नुकसान झाले, त्यात दुर्दैवी घटना घडून पाच मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनास्थळाची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी (दि.२३) सकाळी पाहणी केली.

राष्ट्रीय आपत्तीत व्यवस्थापन देशाला मार्गदर्शन करणाऱ्या पवार यांनी सीरम इ्स्टिटट्यूटमधील आगीचा सविस्तर घटनाक्रम जाणून घेतला. इमारतीला आग कशाने लागली, या सर्व घटनेची, प्रशासनाकडून माहिती घेतली.

पोलीस अधिकारी, सीरम व्यवस्थापन यांच्याकडून आगीची व यापुढे काय- काय उपाययोजना केली, याची सविस्तर माहिती देण्यात आली.

पवार यांनी तातडीने करावयाच्या अनेक प्रकारच्या बाबी, बारकाव्यांसह संबंधितांना सूचित केले. सीरम इ्स्टिटट्यूटचे आदर पूनावाला यांच्याकडून आगीत झालेल्या नुकसानीची, कोविड व चालू असलेल्या उपाय योजना जाणून घेतल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News