धनंजय मुंडें यांच्या ‘त्या’ प्रकरणाबाबत पंकजाताई म्हणाल्या…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-धनंजय मुंडें यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते, बलात्कारासारखा गंभीर आरोप आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिलेली संबंधांची कबुली यामुळे भाजपा नेत्यांकडून मुंडेंवर निशाणा साधत वारंवार राजीनाम्याची मागणी केली जात होती.

दुसरीकडे राष्ट्रवादीने पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यत वाट पाहण्याची भूमिका घेत राजीनामाच्या चर्चेला पूर्ण विराम देत मुंडेना सेफ केले.

त्यातच महिलेने तक्रार मागे घेतली असल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला असून विरोधकही शांत झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर पंकजा मुंडे यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही.

पण, कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो अस पंकजा म्हणाल्या. मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे.

एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही.

संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News