अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकजण माझ्यावर आरोप करत होते, तरीही अहमदनगरमधून जावई संग्राम जगताप विरोधी पक्षातील उमेदवार असतानाही माझ्या मतदारसंघातून 70 हजारांचा लीड देण्याचं काम मी केलं होतं, असा दावा कर्डिले यांनी केला आहे.
काही जणांची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी आहे. विरोधकांचा असा समाचार आ. कर्डिले यांनी घेतला.
माझ्यावर आरोप करणारे रात्री दोन वाजेपर्यंत जागून सकाळी 12 वाजता उठणारी हीच ती माणसं आहेत, असा टोलाही शिवाजी कर्डिले यांनी विरोधकांना लगावला.
मी निवडणुकीच्या काळात प्रक्रियेचा भाग म्हणून मी प्रचार करतो. खरं तर निवडून आल्यानंतर लगेच माझा प्रचार सुरु होतो. सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत माझा जनतेच्या संपर्कात असतो, त्यामुळे दर आठवड्याला जनता दरबार भरतो. त्यामुळे मला चिंता वाटाण्याचं काही कारणचं नाही! असं आ. कर्डीले म्हणाले.
माझा विजय हा निश्चित होणाराच आहे, तसेच अहमदनगरमधील इतर मतदारसंघातही भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मी निवडून आणेन, असा विश्वास शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केला.