अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी एक म्हण आहे. पण, कधी कधी स्वप्न प्रत्यक्षात उतरतात. तीही अजिबात कल्पना नसताना. असंच काहीसं एका जोडप्याबाबत घडलं आहे.
नवऱ्याने 20 वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका स्वप्नामुळे बायकोने 437 कोटींची मालकीण बनली आहे. एका महिलेला कोरोना विषाणूच्या साथीमध्ये कंपनीतून काढून टाकण्यात आले होते, परंतु त्यानंतर लवकरच ती 437 कोटींची मालकिन बनली. खरं तर, कॅनडाच्या टोरोंटोमध्ये राहणाऱ्या या महिलेने लॉटरीमध्ये 60 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम जिंकली.
पण नवऱ्याने जर ते स्वप्नात पाहिले नसते तर त्या बाईला लॉटरीमध्ये इतकी मोठी रक्कम मिळाली नसती! एका स्वप्नामुळे एक महिला शेकडो कोटींची मालकिन कशी बनली? ते जाणून घेऊया सीएनएन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 57 वर्षीय डेंग प्रवतुडोम यांना 437 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.
त्यांच्या पतीला 20 वर्षांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं. या स्वप्नात त्यांना काही क्रमांक दिसले. याच क्रमांकांमुळे डेंग यांना ही बंपर लॉटरी लागलीय. डेंग यांना दोन मुलं आहेत. मागील 20 वर्षांपासून त्या आपल्या पतीच्या स्वप्नातील आकड्यांप्रमाणे लॉटरीचं तिकिट विकत घेत होत्या.
इतके वर्ष लॉटरी लागली नाही तरीही त्यांनी या आकड्यांचा पिछा काही सोडला नाही आणि आता त्यांना याचं फळ मिळालंय. कॅनडाच्या ओंटरियो लॉटरी अँड गेमिंगने डेंग यांनी 437 कोटी रुपये जिंकल्याचं जाहीर केलंय. विशेष म्हणजे आपल्याला लॉटरीत इतकी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती या महिलेला आपल्या पतीकडूनच मिळाली.
डेंग म्हणाल्या, “437 कोटी रुपये जिंकल्याची बातमी ऐकून मी खूप आनंदी आहे. मला हे ऐकून अगदी रडूच आलं. सुरुवातीला तर माझा यावर विश्वासच बसला नाही.” डेंग यांना नुकताच एका व्हर्च्युअल कार्यक्रमात आपल्या लॉटरीच्या रकमेचा चेक देण्यात आला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved