अहमदनगर ब्रेकिंग : २० लाखांच्या चोरीच्या बुलेट गाड्या जप्त, बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्यातुन बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

त्यांच्याकडून २० लाख ५० हजारांच्या १३ बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशाल बाळासाहेब मगर (वय २०, रा. लेहणेवाडी, ता जामखेड, जि. अहमदनगर), विशाल बंकट खैरे (वय २१, रा. भुतवडा. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांचा मुख्य साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (रा. घाटकोपर, मुंबई) याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन कालावधीत अनेकांनी सहज पैसे मिळविण्यासाठी चोरीच्या गुन्ह्याकडे वळले. त्यावर अंकुश मिळविण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी वाहन चोरांची माहिती काढण्यास सुरुवात केली. वाहन चोरी झालेल्या घटनास्थळावरील परीसरातील सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करुन त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल शिवाजी ढोबळे घाटकोपर मुंबई हा बुलेट मोटर सायकल चोरी करीत असल्याचे आढळले.

अमोल याने चोरलेली एक बुलेट दुचाकी विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार मोशी टोलनाका परीसरामध्ये येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. २४) पोलिसांनी मोशी टोलनाक्यावर सापळा लावला. पोलिसांनी आरोपी मगर आणि खैरे यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे एक बुलेट आढळली. अधिक तपास केला असता ती बुलेट मोटर सायकल त्यांचा मित्र अमोल ढोबळे याने चोरी करुन त्यांना विक्रीसाठी दिली. अमोल ढोबळे याने १२ बुलेट मोटर सायकल व इतर दोन मोटर सायकल जामखेड येथे विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परीसरातून चोरुन आणून विक्रीसाठी ठेवलेल्या १३ बुलेट मोटर सायकल व एक अपाची मोटर सायकल, एक अक्टीवा मोपेड अशा एकूण २० लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment