युती सरकारच्या धोरणांमुळे मंदी : आ.जगताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : नगर शहराचा आमदार म्हणून पाच वर्षे काम करतांना शहराच्या विकासात मोलाची भर घातली असून मोठे विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. विकासकामे करण्याबरोबरच एमआयडीसीमध्ये धूळ खात पडलेल्या आयटी पार्कला पुनर्जीवित करून अनेक आयटी कंपन्यांना पाचारण करून शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

एकीकडे विरोधक दादागिरी व गुंडशाहीने कायनेटिकसारख्या मोठ्या कंपनीच्या मालकांना मारहाण करून ती कंपनी बंद पडली. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले. तर मी बंद पडलेल्या कंपनी चालु करुन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सध्या बाजार पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण आहे. या मंदीच्या वातावरणास भाजप-सेना युतीचे सरकार जबाबदार आहे. चुकीच्या धोरणामुळे बाजारपेठ मंदीच्या छायेत आहेत. यासाठी परिवर्तन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले.

आ. जगताप यांनी प्रचारार्थ नगर शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये प्रचारफेरी काढली. कापड बाजार, तेलीखुंट, डाळमंडई, जुना बाजार या परिसरातील व्यापारी मंडळींच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यापारी प्रदीप गांधी, महेंद्र पेढेवाला, किरण व्होरा, श्याम देडगावकर, प्रेम पोखरणा, रमेश नवलानी, जनक आहूजा, अशोक नारंग, अनिल पोखरणा, राहुल मुथा, भूषण फिरोदिया, कमलेश भिंगारवाला, चंदन तलरेजा, कुक्कू तलरेजा, ईश्वर बोरा, संजय चोपडा, विपुल शेटीया, डॉ.विजय भंडारी, बाळासाहेब धाडीवाल, राजू शेटीया, संजय ताथेड आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment